कधी कधी धरणी होते पवित्र परमेश्वर अवतारा,
औंध सारा त्याचाच पसारा !
मी केवळ या सुंदर बेटावरचे पाचू शोधणारा,
खरा शिल्पकार तूच त्यांना घडविणारा !

औंधचे कीर्तिवंत : औंध... एक किमया !

परिचय :

माजी औंध संस्थानाधिपती श्रीमंत भगवानराव श्रीनिवासराव उर्फ बाळासाहेब पंडित पंतप्रतिनिधी
१८६८ : शनिवार दि. २४ ऑक्टो. १८६८ रोजी रात्री साडे नऊ वाजता महाराष्ट्रातील अत्यंत तेजस्वी, पराक्रमी व कीर्तिमान म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रतिनिधि घराण्यात जन्म. ( सातारा येथील पंतांचा गोट या वास्तुत )
१९५१ : शुक्रवार दि. १३ एप्रिल रोजी मृत्यू . ( श्री. भवानी चित्र व वस्तू संग्रालय, औंध येथील आवारात समाधी )

कार्यक्षेत्र :

बी. ए., माजी औंध संस्थान अधिपती, चित्रकार, लेखक, कीर्तनकार, सूर्यनमस्कार उपासक, धर्मभास्कर, उधोगप्रिय, कलाप्रेमी, यंत्रप्रेमी, महान वक्ते, डोळ्यांचे व्यायाम आणि आहार शास्त्र लेखक.

औंधशी ऋणानुबंध :

१८७३ : प्राथमिक शिक्षणास प्रारंभ - औंध.
१८९७ - १९०१ : सप्टेंबर १८९७ मध्ये औंध दरबारात सरचिटणीस म्हणून नेमणूक व या कारकिर्दीत सर्व कर्जाची परतफेड हे वैशिष्टपूर्ण कार्य.
१८९८ : श्रीयमाई श्रीनिवास हायस्कूल व फ्री बोर्डिंग स्कूल सुरु केले, श्रीयमाई देवीचा सभामंडप, विशाळबाग, मॅजिक् लॅंटर्नच्या स्लाईडस् तयार केल्या, कऱ्हाडदेवीपुढे गॅसचे दिवे लावण्याची तजवीज केली.
१९०१- १९०८ : औंध संस्थानाबाहेर वास्तव्य.
१९०९ : ४ नोव्हेंबर रोजी राज्यारोहन. श्रीयमाई श्रीनिवास हायस्कूलचें पुनरुज्जीवन, सक्तीचें प्राथमिक शिक्षण आणि सूर्यनमस्कार, रा. किर्लोस्करांचे कारखान्यास आश्रय व उत्तेजन.
१९१० च्या डिसेंबरांत एडवर्ड दि सेव्हंथ हास्पिटल बनिवण्यास सुरुवात.१९३४ : ८ जानेवारी धी किंग एडवर्ड धी सेव्हंथ हॉस्पिटलच्या इमारतीचे उद्घाटन.
शेतकी प्रदर्शन, ग्रंथसंग्रलय (७,००० हूनही अधिक पुस्तके), चित्ररामायण पुस्तक ( गुजराथी, मराठी, हिंदी, कानडी, तमिळ, बंगाली,व इंग्रजी भाषांमध्ये भाषांतर), यमाई देवीच्या सभामंडपातील चित्रे - १९१०, ११,१२,१३, कै. श्री. राजश्री श्रीनिवासराव महाराज यांचा पुण्यतिथ्युत्सव. सुतसारापद्धति, न्यायखात्यांतील सुधारणा, सल्लागार पंचाची जोड, साहित्यमंडळ औंध
१९१६ : संस्थानात ग्रामपंचायतीची स्थापना.
१९१७ : ३१ ऑक्टो. रोजी पहिली रयत सभा.
१९१९ : १ एप्रिल रोजी डॉ. भांडारकर यांच्या प्राच्य संशोधन मंदिरास, महाभारत संशोधन प्रकाशनास १ लाख रुपयांचे अनुदान.
१९३२ : ९ जानेवारी औंध राजधानी इंडियन ग्लायडिंग अॅसोसिएशनचें केंद्र करण्याचा प्रयत्न.
१९३२ : १४ एप्रिल औंधास पहिलें एअर पार्सल !
१९३५ : इंदुरच्या साहित्यासामेल्नाच्या अध्यक्षपदावर निवडणूक.
१९३७ : प्रजेस जबाबदार स्वराज्य देण्याची व पंचवार्षिक योजनेची घोषणा. 'राजा' हा किताब ब्रिटिश सरकारने दिला.
१९३९ : संस्थांच्या कारभारात लोकनियुक्त मंत्री नेमण्यास प्रारंभ केला.
ललितकलांचे साम्राज्य राज्यकारभार विषयक प्रगति आणि आर्थिक परिस्थिति सुधारण्याविषयक प्रयत्न ह्यांच्या बरोबर ललितकलांचा झालेला परिपोष कोणत्याहि मानसशास्त्रज्ञाला विचार करावयास लावील ह्यांत संशय नाही. श्रीमंत बाळासाहेब सर्व कलांचें अधिष्ठान असल्यामुळे सर्व औंध शहर एक कला-मंदिर बनावें हे साहजिक आहे.
स्त्रोत : संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
बाळासाहेब पंतप्रतिनिधी
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात

परिचय :

औंधचे पहिले पंतप्रधान श्रीमंत परशुरामराव भगवानराव उर्फ अप्पासाहेब पंडित पंतप्रतिनिधी बुधवार दि. ११ सप्टेंबर. १९१२ जन्म.
सोमवार दि. ०५ अक्टोबर १९९२ रोजी मृत्यू.

कार्यक्षेत्र :

१६४४ - १९४८ औंधचे पहिले पंतप्रधान, बी. ए. (ऑनर्स.), एम. ए. (ऑक्सफोर्ड युनिवरसिटी), बॅरीस्टर-एट-लॉ, लिंकन'स इन्न; भारताचे परराष्ट्रातील राजदूत.

पुरस्कार :

पद्मश्री पुरस्कार विजेते

औंधशी ऋणानुबंध :

१९३२ : ९ जानेवारी औंध राजधानी इंडियन ग्लायडिंग अॅसोसिएशनचें केंद्र करण्याचा प्रयत्न.
१९ एप्रिल रोजी कराची ते औंध विमानाने प्रवास केला (निम्याहून अधिक प्रवास स्वत: पायलटचे काम केले)
दक्षिणेंतील पहिले वैमानिक राजपुत्र श्रीमंत अप्पासाहेब यांचा गौरव. १९३७-१९४७ बाळासाहेब, मोरीस फ्रीडमन आणि महात्मा गांधी यांच्या साह्याने औंध एक्प्रीमेंट ( लोकशाही ) औंध संस्थानात राबिवली.
१९३९ मध्ये स्वत: आप्पासाहेब इतराबरोबर औंधची बाजार पेठ व गणेश खिंडीतील रस्ता बनवण्याचे काम केले.
१९४८ पं. जवाहरलाल नेहरू यांनी भारताचे परराष्ट्रातील राजदूत म्हणून ब्रिटीश इस्ट आफ्रिका येथे नेमणूक केली,
१९५१ - १९६१ पॉलीटिकल ऑफिसर म्हणून सिक्कीम, भूटान आणि तिबेट येथे महत्वपूर्ण कामगिरी.
१९६९ - ७२ मध्ये इंडोनिशिया, लंडन, इटली येथे भारतीय राजदूत म्हणून काम केले.
अप्पासाहेबांनी इंग्रजी मध्ये काही पुस्तके लिहिली ती खालील प्रमाणे -
An Unusual Raja - Mahatma Gandhi and the Aundh Experimen, Hyderabad: Sangam Books, 1989.
Surya Namaskar, an ancient Indian exercise, Bombay, Orient Longmans, 1970.
A Moment in Time, Bombay: Orient Longman, 1974.
Mandala: An Awakening, Bombay: Orient Longman, 1976.
Survival of the Individual, London: Sangam Books, 1983.
Undiplomatic Incidents;. Bombay, Orient Longman Limited, 1987
An Extended Family of Fellow Pilgrims,. Bombay, Sangam Books, 1990
स्त्रोत : संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
श्रीमंत बॅ. अप्पासाहेब पंत
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात

परिचय :

पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर ( सप्टेंबर १९, १८६७ कोलगाव, महाराष्ट्र, भारत   -  जुलै ३१, १९६८ पारडी, गुजरात, भारत )

प्रशिक्षण :

जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई ( जे.जे.चे प्रतिष्ठेचे मानले गेलेले 'मेयो मेडल' प्राप्त )

कार्यक्षेत्र :

स्वाध्याय-मंडळाचे संस्थापक , मराठी चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान होते.

पुरस्कार :

२६ जानेवारी १९६८ ला 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले.

औंधशी ऋणानुबंध :

स्वाध्याय-मंडळाची स्थापना : स्वाध्याय-मंडळ या धार्मिक संस्थेची स्थापना पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी १९१८ साली केली.
सन १८९६ - प्रार्थनासमाजाशीं परिचय. सन १९०० - १९०९ थिऑसफिकल सोसायटी मध्ये काम.
सन १९०३ - १९१६ आर्य-समाजात काम.
पुढे अव्दैत, मूर्तीपूजा, श्राध्द आदि धर्मसिध्दान्तांसंबंधी मतभेद उत्पन्न झाल्यामुळे सन १९१६ मध्ये त्यांनी आर्यसमाज सोडला; पण मनामध्ये धर्मसेवा करण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे काय करावें; यासंबंधाच्या विचारामध्ये एक वर्ष घालवून
सन १९१८ सालीं श्रीमंत बाळासाहेब यांच्या सक्रीय उदार प्रोत्साहनामुळे त्यांनी औंध येथे येऊन स्वाध्याय-मंडळ या संस्थेची स्थापना केली.
सन १९२० साली 'वैदिक धर्म' मासिक सुरु केलें.
सन १९२३ सालीं ' भारत मुद्रणालय ' नांवाचा छापखाना औंध येथे सुरु केला.
सन १९२४ सालीं ' पुरुषार्थ ' हे मराठी मासिक सुरु केलें.
सन १९३३ सालीं 'गीता' हे हिंदी तर ' श्रीमभ्द्गवद् गीता ' हे मराठी मासिकें चालू केलीं.
याशिवाय मराठी व हिंदी भाषेत असंख्य मासिके, धर्मग्रंथ, पुस्तके आणि संस्कृत श्लोक संग्रह प्रकशित केले आहेत.
स्त्रोत : इंटरनेट व संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात

परिचय :

ना. लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर (२० जून, इ.स. १८६९ - २६ सप्टेंबर, इ.स. १९५६)

प्रशिक्षण :

जन्म गुर्लहोसूर या गावी झाला. धारवाड आणि कलादगी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ र्आट मधून चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

कार्यक्षेत्र :

व्हीजेटीआय या तंत्रविद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी, मराठी, भारतीय उद्योजक, किर्लोस्कर समूहाचे संस्थापक होते,

पुरस्कार :

रा. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांस दोन वेळा सरकारांतून 'केसर-इ-हिंदचें' रौप्य पदक अर्पण करण्यात आलें.

औंधशी ऋणानुबंध :

१८९७ मध्ये मुंबई सोडून ते बेळगावला आले. इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकलदुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले.
१९०४ मध्ये बेळगाव येथे शेतीचीं औतें तयार करण्याचें काम सुरु केले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते.
१९०१ मध्ये औंध येथील श्रीयामाईचे देवळाचा सभामंडप बांधण्यांचें कंत्राट श्रीमंत बाळासाहेबांच्या कृपेने किर्लोस्करांना मिळालें.
१९१० साली औंध संस्थानाकडून उत्पादनासाठी सवलती मिळाल्यामुळे कुंडल येथे निर्जन आणि निर्जल अशा माळरानावर किर्लोस्कर ब्रदर्स या नावाने लक्ष्मणरावांनी कारखाना उभारला आणि किर्लोस्कर वाडीच्या वसाहती प्रारंभ केला. शेतीसाठी लागणारे लोखंडी नांगर, मोटार, रहाट, चरक इत्यादी वस्तूंचे उत्पादन त्या कारखान्यात सुरु झाले.
खरं म्हणजे कुंडलचा एक भाग म्हणजेच किर्लोस्करवाडी. कुंडलरोड हे स्टेशन आणि त्या जवळची औंध सरकारची जमीन आपल्याला पाहिजे, असं म्हणून औंधच्या राजेसाहेबांना लक्ष्मणराव किर्लोस्करांनी नकाशावर एक वर्तुळ काढून नक्की कोणती जमीन हवी ते दाखवलं. हे वर्तुळ हीच प्रत्यक्ष सीमा मानून औंध सरकारने तेवढी जमीन किर्लोस्करांना दिली. मग त्या भूभागाला किर्लोस्करवाडी म्हणायला लागले. ही जमीन देताना कारखाना काढायला भांडवल म्हणून औंधच्या राजेसाहेबांनी १० हजार रुपयेदेखील लक्ष्मणरावांना दिले होते.
१९२० सालापासून भांडवल वाढविण्यासाठी कारखान्याचे त्यांनी मर्यादित कंपनीत रुपांतर केले. या कंपनीतर्फे आणखी विविध प्रकारचे उत्पादन होऊ लागले. त्यात हातपंप, लहान मोठे यांत्रिक पंप, लेथ मशीन्स तसेच लोखंडी फर्निचर इत्यादी.
१९३५ सालीं ना. लक्ष्मणराव हे औंध संस्थानाचे पहिले लोकनियुक्त दिवाण झाले आणि त्यांच्याकडे शिक्षण, ग्रामसुधारणा, आरोग्य, व्यापार, उद्योगधंदे, शेतकी, दवाखाने इत्यादी खातीं सोपविण्यांत आलीं.
लक्ष्मणरावांनी औद्योगिक कारखाना चालविण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसतांनाही किर्लोस्कर उद्योग समूह त्यांन अतिशय परीश्रमाने उभा केला.
अशा किर्लोस्करांवर २० जून १९६९ आणि २० जुन १९८९ साली भारत सरकार ने पोस्टाचे तिकीट हि काढले.
स्त्रोत : इंटरनेट व संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
नामदार लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
२० जून १९६९
२० जुन १९८९

परिचय :

रा. श्रीपाद प्रभाकर ओगले आणि
रा. गुरुनाथ प्रभाकर ओगले

कार्यक्षेत्र :

ओगले ग्लास वर्क्स लिमिटेड

औंधशी ऋणानुबंध :

१९१३ नोव्हेंबर महिन्यांत किर्लोस्कर बंधूंच्या सहाय्याने रा. श्रीपादराव ओगले यांनी सुमारें दहा पौंड काच वितळवून औंध संस्थानांत प्रथमच तयार झालेली काचेची चिमणी औंध येथील म्युझिअममध्ये पहावयास मिळेल.
१९१३ सालीं सुरुवातीस बांगड्या तयार करणेस लागणारी निरनिराळ्या रंगांची काच तयार करण्याचे काम.
१९१६ सालीं श्रीमंत बाळासाहेबांच्या माद्द्तीने ओगलेवाडी वसवली.
१९२६ सालीं 'प्रभाकर कंदील' ची निर्मिती केली.
पुढे 'प्रभाकर सेफ्टी स्टोव्ह' ची निर्मिती केली.

 

स्त्रोत : संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
रा. श्रीपाद प्रभाकर ओगले
रा. गुरुनाथ प्रभाकर ओगले

परिचय :

पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ पालगड, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत - जून ११, इ.स. १९५०, के.इ.एम.रुग्णालय मुंबई)

कार्यक्षेत्र :

भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते.

औंधशी ऋणानुबंध :

त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता.
अत्यंत हलाकीच्या परीस्थित त्यांना आपले शिक्षण घ्यावे लागले, औंध संस्थांतील शाळा व बोर्डिंग मोफत असल्याने त्यांनी औंधच्या श्री. श्री. विध्यालयात सहावीत प्रवेश मिळवला परंतु राहणे व खाणे या दोन गोष्ठींसाठी खूप हाल सोसावे लागले काहीकाळ तर त्यांनी माधुकरी हि मागितली पुढे शाळेत झोपण्याची सोई झाल्याने त्यांना औंधमध्ये स्थिरता आली परिणामी अभ्यास चांगला होऊन सहामाही परीक्षेत चांगले गुण प्राप्त झाल्याने ( संस्कृतमध्ये तर नव्वद मिळाले.) औंधहूनच मॅट्रिक होण्याचा निर्धार केला पण औंधला प्लेग सुरु झाल्याने त्यांना औंध सोडावे लागले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली.
१९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले.
१९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला.
१९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले.
१९४६ च्या दरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला.
१९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले.
साने गुरुजी यांनी सुमारे ७३ पुस्तके लिहिली होती.
श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली.
साने गुरूजींना मानवंदना म्हणून भारतीय टपाल खात्याने टपाल तिकिट काढले.
स्त्रोत : इंटरनेट व संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
श्री. पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी)
टपाल खात्याने काढलेले टपाल तिकिट
गुगल जाहिरात

परिचय :

पं. अनंत मनोहर जोशी (अंतुबुवा) ( ८, मार्च १८८१, किनई - १२, सप्टेंबर १९६७, मुंबई )

कार्यक्षेत्र :

अनंत मनोहर जोशी उर्फ पं अंतुबुवा जोशी हे कै. पं. बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य व ग्वाल्हेर परंपरेतले एक थोर गायक व गुरू.

पुरस्कार :

१९५५ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार राष्ट्रपतीतर्फे

औंधशी ऋणानुबंध :

वडील मनोहरपंत औंध संस्थानातील किन्हई गावचे. औंधच्या संस्थानिकांनी त्या काळी अनंताच्या शिक्षणासाठी महिना तीन रुपये शिष्यवृत्ती दिली होती. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी तीन रुपये शिष्यवृत्ती ही मोठी मानाची गोष्ट. पं. अनंत मनोहर जोशी, पं. गजाननबुवा जोशी हे दोघेही पितापुत्र संगीताचार्य आणि वादनाचार्य म्हणून प्रसिद्ध होते, आयुष्यभर विद्यादानाच्या पवित्र कार्यात गुंतलेले होते. जे आपल्याला मिळालं आहे ते भरभरून इतरांना द्यावं यावर दोघांचीही नितांत श्रद्धा होती, त्यामुळे विद्यादानाचं अग्निहोत्र अखंड तेवत राहिलं. संगीत शिक्षणाची गरज लक्षात घेऊन पं. अनंत मनोहरांनी गिरगावात श्री गुरु समर्थ गायन वादन विद्यालय सुरू केले. गाण्याबरोबरच तबला, हार्मोनियम, जलतरंग, सतार अशी वाद्ये ते स्वत:च शिकवत असत. पं. अनंत मनोहरांचे वडील ते पाच-सहा वर्षांचे असतानाच गेले. मनोहरपंत हे त्या काळातील विख्यात धृपद धमार गायक होते. ते औंध संस्थानात राजदरबारी सरकारी गायक होते. पण अनंत मनोहरांना मात्र त्यांच्याकडून तालीम मिळू शकली नाही. पित्याचं छत्र इतक्या लवकर हरपलं खरं, पण मुलाचा आवाज चांगला आहे आणि वडील गेले तरी मुलाचं नुकसान होता कामा नये, याची जाणीव ठेवत त्यांच्या आईनं अनंत मनोहरांना पं. बाळकृष्णबुवांकडे सोपवलं. त्या वेळेस पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं. गुंडुबुवा इंगळे अनंत मनोहरांचे सहाध्यायी होते, आणि ही त्रयी 'अंतू, विष्णू, गुंडू' म्हणून प्रसिध्द होती. अंतूबुवा आणि विष्णूबुवा दोघाही गुरुबंधुंना संगीत शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि त्यासाठी संगीत विद्यालये स्थापन व्हावीत असे वाटत होते. त्याप्रमाणे विष्णुबुवांनी लाहोरला १९०५ साली पहिले संगीत विद्यालय स्थापन केले आणि अंतूबुवांनी १९०७ मध्ये गिरगावात संगीत विद्यालय स्थापन केले. त्या वेळेस अशा संगीत शिक्षणाची नितांत गरज भासत असल्यानं त्यांच्या संगीत विद्यालयाचा लवकरच विस्तार झाला, 'प्रिन्सिपॉल जोशी' म्हणून ते प्रसिद्धही झाले. मग १९२१ मध्ये विद्यालय बंद करून त्यांनी मुंबई सोडली. गाण्याचे कार्यक्रम करून अर्थार्जन करून दोघांचा चरितार्थ कसाबसा चालला होता. पण पुन्हा दैव हसले, प्रसन्न झाले. औंध संस्थानात नोकरी लाभली. औंधचे संस्थानिक स्वत: कीर्तने करीत. संगीताची त्यांना आवड होती. कीर्तनाला साथ करायला ते अंतुबुवांना सांगत. देवीच्या देवळात रोज गाण्याची हजेरी लावणे हेही अंतुबुवांचे काम असे.
पुढे औंध संस्थांचे राजगायक झाले, त्यांनी औंध येथे राहून अनेक शिष्य तयार केले. १९४० साली पं. अंतुबुवांनी औंध येथे आपल्या आध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद यांच्या मृतू पच्यात त्यांच्या अस्ती ठेवलेल्या जागी दत्त मंदिर बांधले व आपल्या गुरूंच्या पुण्यतिथीला आश्विन वद्यपंचमी ह्या दिवशी संगीत सेवा सुरु केली.
अंतुबुवांचे महाराष्ट्रात ग्वालियर घरांना गायकीच्या प्रसारात मोठे योगदान आहे.
स्त्रोत : इंटरनेट व संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
पं. अनंत मनोहर जोशी (अंतुबुवा)
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात

परिचय :

पं. गजानन अनंत जोशी (बुवा) ( ३०, जानेवारी १९११ – २८, जून १९८७ )

कार्यक्षेत्र :

पं. गजानन अनंत जोशी (बुवा) हे अंतुबुवांचे चिरंजीव व शिष्य, तसेच ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व गुरू.

पुरस्कार :

पं. गजाननबुवांचे सत्कार, सन्मान खूप झाले. १९७० साली मुंबईच्या ट्रिनिटी क्लबने त्यांच्या एकसष्टीप्रीत्यर्थ त्यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. तंत्रविलास, तानसेन, १९७२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारासारखे मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले.

औंधशी ऋणानुबंध :

पं. अनंत मनोहर जोशी, पं. गजाननबुवा जोशी हे दोघेही पितापुत्र संगीताचार्य आणि वादनाचार्य म्हणून प्रसिद्ध होते, गुरुसमर्थ विद्यालयाच्या जागेतच पं. गजाननबुवांचा जन्म झाला. त्यांच्या रक्तात गाणे होतेच. याशिवाय संस्कारक्षम वयातच सुरांचा भरपूर सहवास मिळाला, त्यामुळे गजाननबुवांची हा हा म्हणता सुरांशी दोस्ती झाली. अनंत मनोहरांनी लहानपणी पित्याचं छत्र गमावलं, तर गजाननबुवांनी आईचं छत्र गमावलं. पण अनंत मनोहरांच्या आईनं जसं त्यांचं नुकसान होऊ दिलं नाही, तसं त्यांनीही 'माता-पिता-गुरू' अशा तिन्ही भूमिका स्विकारून गजाननबुवांचं नुकसान होऊ दिलं नाही. 'गवैय्याचा मुलगा गवैय्याच झाला पाहिजे', हे त्यांचं स्वप्न होतं.
गजानन बुवांचे घराणे संगीताचा वारसा जपणारे होते. त्यांचे आजोबा मनोहर यांनी ध्रुपद व धमार गायकीचा अभ्यास केला होता. त्यांचे वडील अनंत (अनंत मनोहर जोशी उर्फ अंतुबुवा) हे प्रसिद्ध ख्याल गायक होते. गजाननबुवांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खान व जयपूर-अत्रौली घराण्याचे भुर्जी खान हेही त्यांचे संगीत गुरू होत.
औंधच्या पंतप्रतिनिधींना व्हायोलिन हे वाद्य आवडे. छोटय़ा गजाननाला संस्थानिकांनी व्हायोलिन आणून दिले. वडिलांनी शिकवलेली गायकी व्हायोलिनमधून काढता काढता गजाननबुवा तयार होऊ लागले आणि संस्थानिकांच्या कीर्तनाला साथ करू लागले. साथीमुळे व्हायोलिनवादनात अधिक प्रवीण होऊ लागले. वादनासाठी खास गुरू वगैरे नसूनही गायकीची केलेली मेहनत ते व्हायोलिनवर करीत आणि अशा तऱ्हेने बालवयातल्या मेहनतीचे फळ असे मिळाले की, सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक म्हणून बोलबाला झाल्यावर लोक म्हणत असत- 'गजाननबुवांचे व्हायोलिन गात असते.'
गजाननबुवा हे गायनासोबतच व्हायोलिनही तितक्याच उत्कृष्टतेने व सहजतेने वाजवायचे. वयाच्या २० व्या वर्षी गजाननबुवांनी व्हायोलिन वादनात प्रावीण्य मिळवले होते. पं मधुबुवा जोशी हे गजाननबुवांचे चिरंजीव आणि शिष्य होत. त्याचप्रमाणे पं उल्हास कशाळकर, पद्मा तळवलकर, अरुण कशाळकर, शुभदा पराडकर ही गजाननबुवांची शिष्य परंपरा आहे.
पं. गजाननबुवांना प्रथम प्रसिद्धी मिळाली ती व्हायोलिन वादनामुळेच. 'अ' श्रेणीदेखील प्रथम व्हायोलिन वादनामुळेच त्यांना आकाशवाणीकडून मिळाली. आकाशवाणीचे राष्ट्रीय कार्यक्रम, संगीत संमेलनातील कार्यक्रम, चेनबुकिंग सर्व काही मिळत गेले. व्हायोलिनवादक म्हणून त्या काळी पं. गजाननबुवा व पं. व्ही. जी. जोग ही दोन नावे खूप गाजली. त्यात गायकी अंगाचे वादन पं. गजाननबुवांचे वैशिष्टय़ होते. 'लयीचा बादशहा', 'मफिलीचा कलावंत', 'गवैय्यांचे गवई' असा नावलौकिक मिळवला.
औंध येथील संगीत सेवा पं. गजानन बुवांच्या तर्फे व्यक्तिगत सुरु होती. परंतु वाढता खर्च विचारात घेता तसेच हा उत्सव कायम स्वरूपी, अधिक व्यापक व सुसूत्रपणे होत रहावा म्हणून पं. गजानन बुवा जोशी ह्यांनी दि. २५ डिसेंबर १९८० रोजी " शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान " ह्या नावाने ट्रस्ट विश्वस्त संस्था म्हणून नोंदीत केला.
स्त्रोत : इंटरनेट व संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
पं. गजानन बुवा जोशी
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात

परिचय :

गजानन दिगंबर माडगूळकर ( गदिमा ) ( ऑक्टोबर १, १९१९ शेटफळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत – डिसेंबर १४, १९७७ पुणे, महाराष्ट्र, भारत)

कार्यक्षेत्र :

साहित्य, चित्रपट, गीतरचना, कथा, कादंबरी, गीतरामायणकार.

पुरस्कार :

गदिमांना भारत सरकारने पद्मश्री (१९६९) हा किताब बहाल केला. ते संगीत नाटक अकादमी व विष्णुदास भावे गौरवपदक या पुरस्कारांचे मानकरी ठरले. १९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते.

औंधशी ऋणानुबंध :

वयाची १६ वर्षे होई पर्यंत गदिमांचे औंध संस्थानात वास्तव्य होते. ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. ग.दि.माडगूळकर हे एक कवी म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत. 'आधुनिक वाल्मिकी 'अशा शब्दात त्याचा गौरव केला जातो .ग.दि.माडगूळकरांनी मराठीतील व हिंदीतील अनेक चित्रपटांच्या कथा, संवाद, व गाणी लिहिली आहेत. त्यापैकी काही गाजलेले चित्रपट - पुढचं पाऊल, बाळा जो जो रे, लाखाची गोष्ट, ऊन पाऊस, सांगत्ये ऎका, जगाच्या पाटीवर, इत्यादी.
कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाङ्‌मय प्रकारांतही त्यांनी लेखन केले. त्यांनी सुमारे १५ लघुकथा लिहिल्या; आकाशाची फळे, उभे आडवे धागे या कादंबर्‍या व युद्धाच्या सावल्या हे नाटक - इत्यादी स्वरूपाचे लेखनही त्यांनी केले. गदिमांनी सुमारे १४५ मराठी चित्रपटांची गीते लिहिली, ८० पटकथा, ४४ मराठी चित्रपटांच्या कथा व ७६ चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी केले. तसेच २३ हिंदी पटकथा, १० हिंदी चित्रपट कथा, ५ हिंदी चित्रपटांचे संवाद - यांचेही लेखन त्यांनी केले. त्यांनी सुमारे २५ (२४ मराठी व १ हिंदी) चित्रपटांत अभिनयही केला.
माडगूळकरांच्या चैत्रबन व जोगिया या काव्यसंग्रहाना आणि मंतरलेले दिवस या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. ग्रंथसंपदा : चैत्रबन, जोगिया, गीतारामायण, गीतगोपाल, गीतसौभद्र, चंदनी उदबत्ती, कृष्णाची करंगळी, आकाशाची फ़ळे, वाटेवरच्या सावल्या, बांधावरच्या बाभळी, तीळ आणि तांदूळ, मंतरलेले दिवस इत्यादी.
स्त्रोत : इंटरनेट व संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
श्री. ग. दि. मडगुळकर
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात

परिचय :

श्री. शंतनुराव किर्लोस्कर ( २८ मे, इ.स. १९०३ - २४ एप्रिल, इ.स. १९९४; पुणे, महाराष्ट्र )

कार्यक्षेत्र :

संचालक, किर्लोस्कर समूह

पुरस्कार :

व्यापार व उद्योग क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची कदर करत भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६५ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

औंधशी ऋणानुबंध :

शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर हे मराठी, भारतीय उद्योजक होते. किर्लोस्कर समूहाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर त्यांचे वडील होते. लहानपण औंध संस्थानात गेले, श्रीमंत बाळासाहेब हे त्यांचे आदर्श व्यक्तिमत्व होते.
शंतनुराव एका ठिकाणी म्हणतात " माझी वाढ औंधाच्या मातीत आणि वातावरणात झाली. त्या भूमीतले आम्ही व्देष आणि तिरस्कार शिकलो नाही. आम्ही शिकलो एकमेकांवर प्रेम करायला. सगळ्यांनीच वाढवं आणि मोठं व्हावं हेच आम्ही शिकलो. राजेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमची व आमच्या कारखानदारीची झालेली वाढ ही अशी माणसाबद्दलचा आदर ठेवून व त्याच्यावर प्रेम करून झाली".
स्त्रोत : इंटरनेट व संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
श्री. शंतनुराव किर्लोस्कर
गुगल जाहिरात

परिचय :

अॅड. शंकर रामचंद्र खरात (जुलै ११, १९२१ - एप्रिल ९, २००१)

कार्यक्षेत्र :

हे मराठी लेखक, कादंबरीकार होते. ते मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरूही होते.
बँक ऑफ इंडियाचे संचालक
ऑफिसर्स सिलेक्शन कमिटीचे चेअरमन

पुरस्कार :

अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, जळगाव, १९८४

औंधशी ऋणानुबंध :

औंध संस्थानातील आटपाडी गावात जन्मलेल्या शंकररावांचे बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले. शंकररावांनी लोखंडी लामणदिव्यावर अभ्यास केला. चार बुकांच ज्ञान पदरी पडावं यासाठी औंधला शिक्षणासाठी ते उंटाच्या मागे पायी चालत गेले. तिथल्या शिक्षकांनी त्यांना खूप मदत केली. पुढे ते फर्ग्युसन कॉलेजमधून पदवीधर झाले. परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपले एल. एल. बी. चं शिक्षणही त्यांनी मोठ्या चिकाटीने पूर्ण केले.
आपल्या या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा या ध्येयापोटी त्यांनी दलित चळवळीत उडी घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या त्यांच्या कामाला अधिक गती प्राप्त झाली. बँक ऑफ इंडियाचे संचालक, ऑफिसर्स सिलेक्शन कमिटिचे चेअरमन आणि मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू अशी अनेक सन्मानाची पदं त्यांनी भूषविली.
अनेक कादंब-याही त्यांनी लिहिल्या. त्यांच्या लेखनात समाजातील शेवटच्या स्तराचे दैन्य, दारिद्र्य, वेदना, अवहेलना, पारदर्शकपणे व्यक्त झाली आहे. दलित व भटक्या जमातीच्या विकास योजनांसंदर्भातील मागण्या , त्यांना स्वावलंबी, स्वतंत्र व जीवन जगण्याची संधी मिळण्याची आवश्यकता याबाबतीसंबंधीचे खरातांचे विचार त्यांच्या या लेखनातून स्पष्ट होतात.
तराळ अंतराळ (१९८१) हे त्यांचे आत्मचरित्रही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
स्त्रोत : इंटरनेट व संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
अॅड. शंकरराव खरात
गुगल जाहिरात

परिचय :

डॉं. केशव नारायण वाटवे ( ---- - १९८१)

कार्यक्षेत्र :

प्राचीन मराठी पंडिती काव्य, रसविमर्श, पाच मराठी कवी, संस्कृत काव्याचे पंचप्राण, सांस्कृत साहित्यिक.

औंधशी ऋणानुबंध :

१९१३ साली हायस्कूलला मुबई विध्यापिठाची संमती मिळाली व ते हायस्कूल झाले, त्या साली प्रथम एकच विध्यार्थी विध्यापिठाच्या मैंट्रिक परीक्षेस पाठविण्यात आला व तो चांगल्या तऱ्हेने पासही झाला. त्यामुळे हायस्कूल म्हणून श्रीयमाई श्रीनिवास हायस्कुलास कायमची मान्यता मिळाली, तो पहिला विध्यार्थी म्हणजेच डॉं. के. ना. वाटवे होय.
स्त्रोत : संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
डॉं. के. ना. वाटवे

परिचय :

श्रीधर कृष्ण कुलकर्णी उर्फ शाहीर पठ्ठे बापूराव ( ११ नोव्हेंबर १८८६ रेठरेहरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली - २२ डिसेंबर १९४५ पुणे )

कार्यक्षेत्र :

लावणी, शाहिरी

पुरस्कार :

१९४२ साली श्रीमंत आबासाहेबांच्या हस्ते जॉन स्मॉल मेमोरियल पुणे येथे जाहीर सत्कार झाला.

औंधशी ऋणानुबंध :

लहानपणापासून श्रीधरला तमाशाचा नाद लागला. त्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. आई-वडिलांनी श्रीधरला शाळेत घातले. त्याचवेळी त्याला कविता करण्याचा छंद लागला व त्याचा गळाही गात राहिला. ग्रामीण भागात गायल्या जाणार्‍या जात्यावरच्या ओव्यां ऐकूनऐकून त्यांनी त्यात ही नवे बदल केले. त्यांनाही `श्रीधरची गाणी ` लोकप्रियता मिळाली. त्याचा परिणाम औंधच्या राजांनी दखल घेऊन श्रीधरला आपल्याकडे बोलवून घेतले. श्रीधरचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. पुढे राणी साहेबांनी श्रीधरला बडोद्यास नेले. तेथे संस्कृत बरोबर यंत्र दुरुस्तीचे शिक्षण ही घेतले. नोकरीही केली. अवघ्या सतराव्या वर्षी पठ्ठे बापूरावांवर संकट आले. आई-वडिलांचे कृपा छत्र हरविले. शेवटी बडोद्याची नोकरी सोडून श्रीधर परत आला.
बापूरावांचे स्वत:चे काव्य, योग्यसाथ, पहाडी आवाज आणि लावणीतील शृंगाराने तमाशा बदलला. त्यातून श्रीधरची वाहवा मिळता मिळता `पठ्ठेबापूराव ` म्हणून ते प्रसिद्धीला आले. १९०८-०९ साली छ. शाहू महाराजांसमोर त्यांनी `मिठाराणी' चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला.
आजही रातधुंदीत जागवा म्हणत त्यांची कवने गात शाहीर रात्री जागवितात.
स्त्रोत : इंटरनेट व संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
शाहीर पठ्ठे बापूराव
गुगल जाहिरात

परिचय :

नागनाथ संतराम इनामदार, ( जन्म : २३ नोव्हेंबर १९२३, मृत्यू १६ ऑक्टोबर २००२ )

कार्यक्षेत्र :

मराठी कादंबरीकार होते. त्यांनी १६ ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिल्या आहेत.

पुरस्कार :

अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, अहमदनगर, १९९७

औंधशी ऋणानुबंध :

ना. सं. इनामदार हे मराठीतील श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरीकार होते. ते सुरुवातीच्या काळात औंध येथील श्री. श्री. विध्यालयात शिक्षक होते.
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरावर लिहीलेली 'बंड' ही त्यांची पहिली कादंबरी, परंतु ती प्रसिध्द होण्यास मात्र १९९६ साल उजाडले. त्या समराच्या शताब्दीच्या निमित्ताने त्यानी ती लिहीली होती. झेप ही त्यांची प्रथम प्रसिध्द झालेली, दुसरी ऐतिहासिक कादंबरी, १९६३ सालामधे प्रकाशित झाली. ज्या काळात वाढते औद्योगिकीकरण, दाबले गेलेले कामगार, बदलणारे सामाजिक आणि व्यक्तिगत वास्तव यांचे पडसाद मराठी साहित्यसृष्टित उमटत होते, त्या काळात आपली आगळी वेगळी शैली घेऊन ना. सं. इनामदार आले आणि त्यांनी मराठी वाचकांना अक्षरश: जिंकून घेतले. इतिहास पुन्हा पुन्हा तपासण्याची 'शिकस्त' केली. त्यांची ही 'झेप' मराठी वाङमय जगताला एका नव्या क्षितिजाकडे नेणारी ठरली.
भूमापनाचे शासकीय खात्यातील त्यांचे काम देखील त्यांना संशोधनाच्या दृष्टिने पूरक ठरले. 'भूमीतरंग' या नियतकालिकाचे ते संपादक होते. कथा लेखनाने त्याच्या लेखनाची सुरूवात झाली. इनामदारांनी आपले वाङमयीन लेखन १९४५ मध्ये 'अनिल' साप्ताहिकातून सुरू केले. १९५८ पर्यंत त्यांनी 'हंस', 'मोहिनी', 'किर्लोस्कर', 'साप्ताहिक स्वराज्य' वगैरे नियतकालिकांतून लेखन केले.
झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ, शहेनशहा, शिकस्त, राजेश्री, अशा त्यांच्या कादंब-यांनी तो काळ भारून टाकला होता. ही सारी निर्मिती १९६२ ते १९८६ या दोन तपांत झाली. त्यांची 'घातचक्र' ही कादंबरी देखील प्रकाशित झाली आहे. मंत्रावेगळा, झुंज आणि झेप या तिन्ही कादंब-यांना राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. १९९७ येथे झालेल्या नगर येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चे ते तीन वर्ष उपाध्यक्ष होते.
स्त्रोत : इंटरनेट व संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
ना. सं. इनामदार
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात

परिचय :

माधव श्रीपाद सातवळेकर ( १३, ऑगस्ट १९१५, लाहोर - १६, जानेवारी २००६, अहमदाबाद )

कार्यक्षेत्र :

चित्रकला, राज्याचे माजी कलासंचालक, १९५४ मध्ये 'इंडियन आर्ट इन्स्टिट्यूट' स्थापन केली, ६२ ते ६८ या काळात ते बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष होते, १९६० - ६९ या काळात फेडरेशन ऑफ आर्ट्स इंस्टीट्यूटस् चे अध्यक्ष, १९६९ ते ७५ या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाची जबाबदारी सांभाळली.

पुरस्कार :

मेयो मेडल, १९३५

औंधशी ऋणानुबंध :

माधव सातवळेकरांवर चित्रं पाहण्याचे संस्कार औंध या कलाप्रेमी संस्थानात झाले. त्यांचे बालपण औंध संस्थानात गेले. चित्रकलेचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला. माधवरावांचे वडील पद्मविभूषण, वेदमार्तंड, विद्यावाचस्पती पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर एक उत्कृष्ट चित्रकार होते. पं. सातवळेकर यांनीही मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमधून पध्दतशीर कलाशिक्षण घेतल होते.
माधवरावांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण औंधलाच झाले पुढे बाळासाहेबांच्या शिफारस पत्रामुळे माधवराव मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये दाखल झाले. १९३५ मध्ये त्यांनी डिप्लोमा केला. अभ्यासात प्रावीण्य मिळविलेल्या विध्यार्थास त्याकाळी दिले जाणारे मानाचे 'मेयो मेडल' प्राप्त झाले. जे.जे.चे प्रतिष्ठेचे मानले गेलेले 'मेयो मेडल' ज्या पितापुत्रांनी मिळविले ते म्हणजे पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर व पुढे त्यांचे सुपुत्र माधवराव सातवळेकर. औंधच्या कलाप्रेमी राजघराण्याने दिलेल्या शिष्यवृत्तीवर चित्रकलेचा सखोल अभ्यास करण्यासाठी माधवरावांनी १९३७ ते ४० असा युरोप दौरा केला. आधी इटली, मग लंडन व शेवटी पॅरिसमध्ये अभ्यास केला.
युरोपमधून परतल्यानंतर माधवरावांनी १९४५ साली मुंबईतील ताज हॉटलेमध्ये स्वत:चे वैयक्तिक असे पहिले प्रदर्शन भरवले. इतकी वर्षे चित्रकलेची जी साधना केली ती कितपत यशस्वी झाली आहे हे त्यावरून स्पष्ट होणार होते व झालेही तसेच. चित्ररसिकांनी त्यांच्या चित्रांची मुक्तकंठाने स्तुती केली. यानंतर माधवरावांची स्वतंत्र अशी ३० वर प्रदर्शने झाली. यातील काही प्रदर्शने युरोप, मध्य-पूर्व, युगांडा, केनिया, झांझिबार येथे झाली.
कॅनव्हासवर उजळ आणि आनंदी रंग लावण्यापूवीर् निळ्या रंगाची पार्श्वभूमी तयार करून तिच्या बाह्यरेषा तशाच सोडण्याची माधवरावांची पद्धत. ही केवळ 'शैली' किंवा रंग काळे पडू नयेत म्हणून योजलेली युक्ती कधीच नव्हती. ते त्यांच्या कलाविषयक निष्ठांचे प्रतीक होते. ज्या १९४० - ६० च्या काळात युरोपमध्ये नव्या, बंडखोर आणि काहीशा वावदूक दृश्यकलेचे स्फुल्लिंग चेतवले जात होते, त्या काळात पंडित सातवळेकरांच्या संस्कारांत आणि औंधसारख्या प्रागतिक संस्थानात वाढलेल्या माधवरावांनी वर्तमान चित्रकारांचे अनुकरण करण्याचे टाळून, इतिहासाचा अभ्यास आणि कलाकौशल्याची साधना हे दोन्ही सुरू ठेवले. माधवरावांनी चित्रकलेवर अनेक व्याख्याने दिली. मुलांना चित्रकलेसाठी प्रोत्साहित केले. अनेक लेख तसेच पुस्तकेही लिहिली. 'ऑईल पेंटिग' व 'व्हॉट्स व्हॉट इन आर्ट' ही माधवरावांनी लिहिलेली पुस्तके.
त्यांचे जीवन म्हणजे "इम्प्रेशनिझमचा भारतीय अर्थ शोधण्यात जन्म घालवणाऱ्या एका कलावंताची साधना " च म्हणता येईल.

 

स्त्रोत : संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
श्री. माधवराव सातवळेकर
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात

परिचय :

मधुकर गोपाळ ऊर्फ बाबा पाठक ( १८, नोव्हेंबर १९२९, औंध - २०, मे २०११, पुणे )

कार्यक्षेत्र :

ज्येष्ठ दिग्दर्शक आणि साहित्यिक

पुरस्कार :

प्रपंच या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार आणि व्हॅनक्युअर फिल्म फेस्टिव्हल, कॅनडा येथे उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा पुरस्कार तर 'संथ वाहते कृष्णामाई'ला उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.
प्रपंच, संथ वाहते कृष्णार्मा, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, वारसा लक्ष्मीचा, गरिबा घरची लेक या चित्रपटांना महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शनाचे पुरस्कार मिळाले आहेत.
त्याचबरोबर पाठक यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि ग. दि. मा प्रतिष्ठानच्या ग. दि. मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

औंधशी ऋणानुबंध :

१९५० च्या दशकात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणारे जे मोजके मराठी लेखक - दिग्दर्शक होते त्यात मधुकर पाठक यांचे नाव वरच्या फळीत होते. ज्यांनी अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या एकाहून एक सरस चित्रपटांचे उत्तम दिग्दर्शन केले ते चित्रपट मराठी रसिकांना कधीही विसरता येणार नाहीत. 'प्रपंच', 'संथ वाहते कृष्णामाई', 'संत निवृत्ती ज्ञानदेव', 'स्वयंवर झाले सीतेचे', 'नंदिनी', 'मुक्काम पोस्ट ढेबेवाडी', 'वारसा लक्ष्मीचा', 'चांदोबा चांदोबा भागलास का' यासारख्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचा ठसा मराठी रसिकांवर उमटवला होता. 'गरीबाघरची लेक' या चित्रपटाचे पटकथा - संवादलेखनही त्यांनी केले होते.
औंध येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील औंध संस्थानमध्ये शिक्षक होते. त्यावेळी गदिमा हे त्या शाळेत विद्यार्थी होते. बाबा पाठक यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणही औंध संस्थानमध्ये झाले होते. इंटरपर्यंत सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्याच्या स. प. महाविद्यालयात दाखल झाले आणि त्यांनी तेथे विज्ञान शाखेची पदवी घेतली. औंध संस्थानचा रहिवासी असल्याने पंतांच्या गोटातील वसतिगृहात राहण्याची जागा मिळाली. ललित लेखनाची आवड त्यांना शालेय वयापासूनच होती. ही आवड त्यांनी पुण्यात आल्यानंतर जोपासली. महाविद्यालयीन काळात त्यांची 'काकांचा हिर्‍या' ही बैलावर असलेली कथा एका प्रसिद्ध वाङ्मयीन मासिकात प्रसिद्ध झाली आणि त्यांच्या लेखनाला अधिक हुरूप आला. व्यंकटेश माडगुळकर हे तर त्यांचे वर्गमित्र होते आणि द. मा. मिरासदारही उत्तम दोस्त होते.
गदिमांशी त्यांची ओळख होतीच. त्यामुळे गदिमांकडे प्रथम लेखनिक आणि नंतर सहाय्यक म्हणून ते काम करू लागले. 'प्रपंच' या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटाला त्या वर्षीचे राज्य शासनाचे सर्व पुरस्कार मिळाले. योगायोग म्हणजे त्याच वर्षापासून राज्य शासनाने चित्रपट पुरस्कारांची योजना सुरू केली होती. सलग तीन वर्षे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले ही त्यांच्यातील उत्कृष्ट दिग्दर्शकाला मिळालेली पावतीच होती. त्यांनी हिंदीमध्ये 'इमान', 'दो चोर', 'नालायक' या चित्रपटांसाठी लेखन व सहदिग्दर्शन केले होते. पाठक यांनी अनेक कलाकारांना चित्रपटात पहिल्यांदा संधी दिली. त्यात दिवंगत संजीवकुमार, श्रीकांत मोघे, कामिनी कदम, सतीश दुभाषी, रमेश भाटकर, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, न्या. मृदुला बेहेरे - भाटकर, सुकन्या कुलकर्णी, जयमाला काळे यांचा समावेश होता. राम गबाले, राजा ठाकूर, राजा परांजपे, राज खोसला, पद्मनाथ यांचे सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले. दिग्दर्शनातून वास्तव आणि प्रभावी चित्रण करण्यात पाठक यांचा हातखंडा होता. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'प्रपंच' हा कौटुंबिक जिव्हाळ्याचा चित्रपट पाहता साहित्यसम्राट आचार्य अत्र्यांचे डोळेही भावनातिरेकाने डबडबले होते. पाठक यांनी लेखनही भरपूर केले. झुंज, माणसाच्या मागावर, अवलिया, लागीर, राजपुत्र आणि कालाय तस्मै नम: ही त्यांची पुस्तके उल्लेखनीय आहेत. 'दिव्यांची अवस' आणि 'विजांची साखळी' ही त्यांची पुस्तके अलीकडेच प्रकाशित झाली होती.
गदिमा हे त्यांचे गुरू होते, मार्गदर्शक होते आणि मित्रही होते. गदिमांविषयी त्यांच्या मनात अपार श्रद्धा आणि भक्ती होती. चित्रपट या माध्यमातून त्यांनी मोजकेच पण उत्तमातील उत्तम दिले.
स्त्रोत : इंटरनेट व संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
श्री. मधुकर गो. पाठक
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात

परिचय :

श्री. माधव दत्तात्रय कुलकर्णी ( १५, जुलै १९१९, कुक्कुरवाड )

कार्यक्षेत्र :

शिक्षणतज्ञ, सध्याची धर्मप्रकाश श्रीनिवासय्या हायस्कूल या शाळेचे मुख्याध्यापक, पहिले शिक्षक

पुरस्कार :

शिक्षणकार्याबद्दल १९७० साली त्यांना रोटरी क्लबचा गोपाळ कृष्ण गोखले पुरस्कार,
महाराष्ट्र सरकारचा जस्टिस फॉर पीस व १९७१ साली आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.
१९९९ साली त्यांना केंब्रिजच्या इंटरनॅशनल बायोलॉजिकल ऑर्गनायझेशनचा तर २००२ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचा ज्येष्ठ नागरिक पुरस्कार मिळाला.
शीव शिक्षण संस्था व शाळेचे माजी विध्यार्थी यांच्यातर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते त्यांना शिक्षण विभूषण हा सन्मान प्रदान करण्यात आला.

औंधशी ऋणानुबंध :

औंध संस्थांच्या राणीसाहेबांकडे राजवाड्यात स्वयंपाकाचे काम त्यांच्या आई मिळाले. घरात अठराविश्वे दारिद्र्य. माधुकरी मागून मराठी चौथीपर्यंत शिकले. याच काळात व्यायामाची आवड निर्माण झाली. लाठी, काठी, जांबिया, फरीगदगा या सर्वांचे शिक्षण मिळाले. पुढे औंधच्या महाराजांनी त्यांचे कौशल्य बघून मुले व मुलींच्या ड्रील घेण्याची परवानगी दिली. १९३८ साली मॅट्रिक झाले.
धर्मप्रकाश श्रीनिवासय्या हायस्कूल या शाळेचे मुख्याध्यापक, पहिले शिक्षक, पहिले शिपाई वगैरे सर्व काही होते माधव दत्तात्रय कुलकर्णी. १ जून १९३९ रोजी ही शाळा स्थापन झाल्यापासून तो सेवानिवृत्त झाल्यानंतरही आजतागायत या शाळेवर ठसा आहे तो कुलकर्णीसरांचा.
१९४० साली ते एटीसी, १९४९ साली टीडी, १९५८ साली बीए, १९६० साली बीएड्, नंतर एनसीसी ऑफिसर झाले. १९६४ साली ते पीएच. डी. करण्यासाठी अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात गेले, पण आर्थिक अडचणीमुळे शिक्षण मध्येच सोडून त्यांना परत यावे लागले.
विद्यार्थ्यांना अल्पबचतीचे महत्त्व कळावे म्हणून शाळेत सतत १० वषेर् अल्पबचत योजना राबविण्यात आली. याबद्दल त्यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कारही मिळाला होता. हे सर्व फक्त आपल्या शाळेपुरते मर्यादित राहू नये यासाठी त्यांनी आसपासच्या शाळांचा एक शालासमूह तयार केला व विचार, निरनिराळे प्रयोग यांची देवाणघेवाण सुरू केली.
स्त्रोत : संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
श्री. माधव दत्तात्रय कुलकर्णी
गुगल जाहिरात
गुगल जाहिरात

परिचय :

श्री. रामचंद्र दामोदर नाईक ( एप्रिल १६, इ.स. १९३४ आटपाडी )

कार्यक्षेत्र :

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री, रेल्वे राज्यमंत्री

औंधशी ऋणानुबंध :

जन्मानंतरची पहिली ६ - ७ वर्षे ते औंधमध्ये राहत होते. राम नाईकांच्या मते त्यांच्या जडणघडणित औंधचेहि एक खास स्थान आहे. इथे थोरामोठ्यांच्या अस्तित्वाचे कळत - नकळत जे संस्कार झाले ती शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडली असे ते म्हणतात.
ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात पेट्रोलियम मंत्री होते. १९९७ साली झालेला अपघात, कॅन्सरपासून सुटका असे दोन बोनस पॉईंट जीवनात मिळाल्यापासून अहोरात्र काम करायचे ठरवले आणि यापुढेही साध्या कार्यर्कत्याप्रमाणे काम करत राहणार, असे नाईक म्हणतात.
स्त्रोत : इंटरनेट व संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
श्री. राम नाईक
गुगल जाहिरात

परिचय :

डॉं. सदाशिव उर्फ भाऊसाहेब भवानराव पंत, जन्म : चंपाषष्टी १९३३

कार्यक्षेत्र :

शल्यविशारद ( डॉक्टर )

औंधशी ऋणानुबंध :

डॉं. सदाशिव उर्फ भाऊसाहेब भवानराव पंत हे बाळासाहेब महाराजांचे तिसऱ्या पत्नीचे ९ वे पुत्र आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सर्वश्री पाठक मास्तर, बाबा ( बाळासाहेब ), काकडे मास्तर आणि मांडवेकर मास्तर यांचेकडून औंध येथे घेतले.
श्री. श्री. विद्यालय औंध येथे पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे नु. म. वि. पुणे येथून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. कॉलेजची पहिली २ वर्षे एस. पी. कॉलेज, पुणे येथून. पुढे जी. एस्. मेडिकल कॉलेज आणि के. ई. एम्. हॉस्पिटल परळ, मुंबई येथून एम्. बी. बी. एस्. व एस्. एस्. केले. इंग्लडमधून १९६३ मध्ये एफ्. आर. सी. एस. पदवी घेतली. व्हॅस्क्युलर सर्जरीमध्ये विशेष अभ्यास ओस्लो - नॉर्वे येथे. १९६६ मध्ये भारतात आल्यावर १९६७ मध्ये लग्न झाले. बी. जे. मेडिकल कॉलेज, रुबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल आणि कोटबागी हॉस्पिटल या पुण्यातील नामांकित हॉस्पिटल मध्ये शल्यविशारद म्हणून कार्यरत. फोटोग्राफी, व्यायाम, संगीत आणि प्रवास हे आवाडते छंद. दररोज १०८ सूर्यनमस्कार अजून घालत आहेत.
स्त्रोत : संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
डॉं. भाऊसाहेब भवानराव पंत
गुगल जाहिरात

परिचय :

श्री. नंदकुमार आनंदा इंगळे ( १६, जुलै १९६१, औंध )

कार्यक्षेत्र :

टाटा मोटर्स मध्ये कार्यरत

सत्कार :

प. पु. श्री शामराव महाराज केर्ले कोल्हापूर, भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी, जागविख्यात चित्रकार मुरली लाहोटी, चित्रपती भैय्यासाहेब ओंकार, महाराष्ट्राचे जेष्ठ साहित्यिक शिरीष पै, प्रा. शिवाजीराव भोसले, भारताचे जेष्ठ उद्योगपती श्री. रतन टाटा, एन. डी. ए. चे मान्यवर व इतर अनेक मान्यवरांकडून सत्कार.

औंधशी ऋणानुबंध :

अतिशय गरीब कुठुंबातील जन्म, एकट्या वडिलांच्या सुतारकीच्या व्यवसायावर १० जणांचे कुठुंब अवलंबून होते. अश्या बिकट परिस्थितून १० पर्यंतचे शिक्षण औंधमध्येच पूर्ण केल्या नंतर आय. टी. आय. चे शिक्षण कराड येथून पूर्ण केले. पुढे पुण्यामध्ये टाटा मोटर्स सारख्या नामांकित कंपनीत नोकरी मिळवली .
शाळेत असल्यापासूनच गणपतीच्या मुर्त्या बनवीत असत पुढे राजवाडा, शाळा आणि गावातील मंडळांसाठी मुर्त्या बनविण्याचे काम मिळू लागले, आठवीत असताना ब्रहसप्ती व गणपती अशी एक मुर्ती श्रीमंत राजेसाहेबना दिली तेव्हा राजेसाहेबांनी कौतुक करून १००० रुपयांचे बक्षिशी दिली. त्यावेळेस शाळेत अनेक प्रदर्शने होत होती त्यामुळे औंधचे वातावरणातून कलेचा सुगंध सदैव दरवळत असायचा आणि त्याच मुळे कला अवघत झालेलाचे मान्य करतात. आज नोकरी साभाळून व्यवसाईकरित्या असंख्य शिल्पे घडविली. कलेच्या बाबतीत ना कलेचा घरातील वारसा ना कोणाच्या हाताखाली कलेचे धडे घेतले ना कोणत्या कॉलेजात शिल्पकलेचे शिक्षण घेतले. औंध गावातील जन्म हीच कलेची डिग्री.
बनविलेली काही शिल्पे :
प. पु. श्री शामराव महाराज केर्ले.कोल्हापूर,
भारतरत्न जे. आर. डी टाटा. पुणे,
सुमंत मुळगावकर,
अशोक चक्रविजेते ( एन. डी. ए. मध्ये ) गुरुबच्चन सिंग सालरिया, पुनीत दत्त, मनोज पांडे.
मेजर प्रदीप ताथवडे. पुणे ( कर्वे नगर )
स्वामी समर्थ. औंध
अवतार मेहेर बाबा
स्त्रोत : संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
श्री. नंदकुमार आनंदा इंगळे
बनविलेली काही शिल्पे

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर ( जुलै ८, १९१६ - जून १, १९९८ ) :

हे मराठी भाषेतील लेखक होते. यांनी १९८१ साली अकोला येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात औंधला पंडित सातवळेकरांकडे त्यांच्या 'पुरुषार्थ' आणि 'वैदिकधर्म' या दोन मासिकांचा सहसंपादक म्हणून काम करत होते त्यामुने त्यांही औंधचा सहवास लाभला होता.

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर ( जुलै ६, १९२७ - ऑगस्ट २८, २००१ ) :

श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार. विख्यात साहित्यिक ग.दि. माडगूळकर ह्यांचे व्यंकटेश हे धाकटे बंधू. आपल्या वडील बंधूंच्या पाठोपाठ तेही साहित्यसृष्टीत आले आणि आपल्या प्रतिभेचा एक स्वतंत्र्य ठसा त्यांनी तेथे उमटविला. यांनी १९८3 साली अंबेजोगाई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. हे हि औंध संस्थानाशी संबधित आहेत.

 

टीप :

औंधचे कीर्तिवंत ह्या विभागात नमूद करण्यात आलेल्या व्यक्ती औंध संस्थानाच्या सानिध्यात होत्या हा सर्व कालखंड बाळासाहेबांच्या कारकिर्दीतील होता महाराजानच्या काळात औंध संस्थान काळाच्या पुढे कितेक पटीच्या वेगाने धावत होते म्हणूनच या प्रवाहात येण्याची प्रत्येकाची मनीषा होती, त्याकाळातील प्रत्येक क्षेत्रातील सर्व महारथी सर्व कलाकार, साहित्यिक हे औंधला येवून गेले आहेत. परीसस्थितीशी जागडणाऱ्या कर्तुत्ववनांना औंधचा आसरा लाभला आणि पुढील जीवनात यशस्वी झाले, नावं लौकिक मिळवला, भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर सुमारे एक दशक औंध स्वातंत्र्यात होते पण स्वातंत्र्या नंतर औंध अश्या काळोखात अडकले कि जेवढे पुढे धावत होते त्याच्या कितीतरी पटीने मागे पडले, सध्याच्या स्थितीमध्ये काही लोकांना त्यादृष्टीने काहीतरी करावेशे वाटले व त्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न केला म्हणूच आम्ही आश्या काही व्यक्तींना येथे नमूद करत आहोत.

 

श्री. आप्पा पुराणिक :

श्री. श्री. विध्यालायातील विध्यार्थी पुढे ह्याच शाळेत ड्रॉईंग शिकक्षक होते. बाळासाहेबांचा कालखंड बालवयात अनुभवला असल्याने आपल्या परीने औंधसाठी कार्य करण्याच्या हेतूने असंख्य उपक्रम राबवले पैकी 'औंध वेटलिंग ट्रस्ट' चे ते प्रशासक झाले व परदेशातील देणग्याच्या स्वरुपात साह्य मिळवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले.
सध्या आपल्या अनुभवांवर औंध संबधित लिखाण करताहेत.

श्रीमती निर्मला दिवेकर :

सून म्हणून औंध मध्ये आल्या नंतर येथील औंधचा सुवर्णकाळ अनुभवत असताना विचाराणा शब्दरूप प्राप्त झाले आणि औंध येथील विविध विषयांवरती कविता करू लागल्या अनेक कवितांची निर्मिती केली. यांच्या कविता ऐकताना त्याकाळचे साक्षात दर्शन झाल्याचा अनुभव येतो.
निर्मलाताईंच शिक्षण अवघे ७ वी पर्यंतचे. त्या काळच्या कौटुंबिक व सामाजिक परिस्थितीस अनुसरून, पुढे शिकून बुद्धीचा विकास करण्याची अधिकृत संधी त्यांना मिळाली नाही. पण वडील स्वातंत्र्य सैनिक; त्यामुळे घरातील वातावरण देशप्रेमाने भारलेले. कुटुंब मोठे म्हणून धार्मिक संस्कार सर्व प्रकारचे. त्यामुळे त्यांचे विचार व्यापक झाले. या वातावरणाचे प्रतिबिंब त्यांच्या गाण्यात, ओव्यात, उखाण्यात दिसून येते. पारंपारिक रीति-रीवाजांच्या वर्णनात त्यांचे आधुनिक विचार सहज प्रगट होतात.

श्री. दत्तात्रय जगदाळे :

येथे नमूद असलेल्या सर्व व्यक्ती ह्या इतिहासाला अनुभवलेल्या आहेत पण श्री. दत्तात्रय जगदाळे हे सध्याच्या पिढीतील व्यक्तीमहत्व सामाजिककार्यात कार्यरत आहेत. विशेष उल्लेखनीय कामगिरी म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमच बाळासाहेब महाराजांच्या कार्याला उजाळा देण्याच्या हेतूने त्यांच्या 'राजवैभव' या प्रतिष्ठानच्या वतीने 'श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी कलाभूषण' हा राज्यस्तरीय पुरस्कार आजवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. जयंत नारळीकर व समाज सेवक श्री. अण्णा हजारे अश्या तीन महनीय व्यक्तींना देण्यांत आला.

 

स्त्रोत : इंटरनेट व संदर्भ सूची | औंधचे कीर्तिवंत .....
गो.नी. दांडेकर
व्यंकटेश माडगूळकर
श्री. आप्पा पुराणिक
श्रीमती निर्मला दिवेकर
श्री. दत्तात्रय जगदाळे