माझे प्रयत्न मला तेव्हा वाटत होते तसे 'निष्काम' नव्हते.
म्हणूनच कदाचित मी लोकांच्या मनात संशय निर्माण करीत असेन,
स्वत:ला अडथळे निर्माण करीत असेन.
भगवान बुध्द म्हणतात त्याप्रमाणे 'सम्यक् कर्म' करावयाची जर माझी पात्रता असती तर ?
                                                                                             - अप्पासाहेब पंतप्रतिनिधी
सन्मान : औंध... एक कौतुक !

sanman01

| सन्मान.....
राज्य मराठी विकास संस्थेचे पारितोषिक
पारितोषिक समारंभ

औंधवर प्रकाशझोत http://aundh.info आनंद मोहन साळुंखे यांची संकल्पना आणि निमिर्ती असणाऱ्या या वेबसाइटला तृतीय क्रमांक मिळाला. ही वेबसाइट म्हणजे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या औंध संस्थानच्या गतवैभवावर टाकलेला एक प्रकाशझोत आहे. श्रीमंत बाळासाहेबांचा सूर्यनमस्कारांचा प्रचार व प्रसार, उद्योगशिलतेला दिलेले प्राधान्य, खुल्या तुरुंगाचा यशस्वी प्रयोग, तसेच त्यांच्या 'चित्रकलेतून' व कलोपासनेतून निर्माण झालेले भवानी 'चित्र-वस्तूसंग्रहालय अशा ऐतिहासिक' आणि अभ्यासपूर्ण माहितीची आकर्षक मांडणी या वेबसाइटावर करण्यात आली आहे. औंधमधील यमाई देवीचे प्राचीन मंदिर, महाराष्ट्रातील सर्वात उंच दगडी दीपमाळ तसेच आजही दिमाखात साजरे होणारे होणारे संगीत महोत्सव, यात्रा, बैल बाजार याबद्दलची माहितीसुद्धा या वेबसाइटावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचप्रमाणे औंधचे एक पर्यटनस्थळ म्हणून वाढते महत्व लक्षात घेऊन पर्यटन दृष्टीकोनातून आवश्यक तपशील वाचकांसाठी देण्यात आला आहे. मुंबईतील सर जे. जे. कला महाविद्यालायातून घेतलेल्या कलेच्या उच्चशिक्षणाला ऐतिहासिक ज्ञानाची जोड देत अनेक अडचणीवर मात करत तीन वर्षांच्या अथक परिश्रमातून श्री. साळुंखे यांनी या वेबसाइटाची निमिर्ती केली आहे. दृक-श्राव्य माध्यम, काव्यात्मक लेखनशैली तसेच आधुनिक तंत्रांचा योग्य वापर हे या वेबसाइटाचे वैशिष्ट्यं नक्कीच कौतुकास्पद आहे. आजवर या वेबसाइटाला १८ हजारहून अधिक वाचकांनी भेट दिली आहे.

 

sanman01

| सन्मान.....
पारितोषिक समारंभ
पारितोषिक समारंभ
पारितोषिक समारंभ

sanman01

| सन्मान.....
पारितोषिक समारंभ
'औंध स्नेहसंमेलन ' सन्मान चिन्ह (२०१०)